सेनगाव: सवना जिल्हा परिषद गटातून क्रांतिकारी शेतकरी संघटना निवडणूक मैदानात उतरणार, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे
हिंगोली जिल्ह्यात येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाढणार असून या निवडणुकीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना देखील उतरणार असल्याची माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सदैव रस्त्यावर उतरून शासन,प्रशासनाला धारेवर धरून शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देणारी क्रांतिकारी शेतकरी संघटना आता शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर वैशाली गजानन कावरखे यांना निवडणूक मैदानात उतरवणार आहे.