नागपूर शहर: नागपुरात चोरट्यांचा हैदोस! सुप्रसिद्ध 'आनंद भंडार'मध्ये धाडसी चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद
नागपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आता चोरट्यांनी थेट शहरातील एका सुप्रसिद्ध प्रतिष्ठानाला लक्ष्य केले आहे. नागपूरमधील नामांकित 'आनंद भंडार'येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.