अमरावती शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि नागरिकांना सकस व आनंददायी वातावरण मिळावे या उद्देशाने “हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम (Raahgiri)” हा अभिनव उपक्रम अमरावती महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी आज २८ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी ४.०० वाजता अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्राथमिक स्वरुपाची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे नियोजन....