नागपूर शहर: ११ गुन्ह्यांची उकल, १० दुचाकींसह लाखोचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट पाचची कार्यवाही विनायक गोल्हे पोनी
24 जूनला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने वाहन चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यात दोन आरोपी आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये शहानवाज शहा व फैजान खान यांचा समावेश आहे.या कारवाईत १० दुचाकी आणि घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ९ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी नागपूर शहरातील विविध भागांत १० घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. आर