नागपूर शहर: डाक बंगला पिपळा येथे दिवसाढवळ्या चोरी: ओमिनी गाडीतून ५ लाखांची रोकड पळवली, बघा थरारक सीसीटीव्ही फुटेज
खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डाक बंगला पिपळा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ओमिनी गाडीतून अज्ञात चोरट्याने ५ लाख रुपये रोख असलेली बॅग पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे