रावेर: हिंगोणा येथे २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर केला गर्भपात,फैजपूर पोलिसात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 20, 2025 हिंगोणा या गावात एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने संदीप भालेराव याने लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला त्यातून ती गर्भवती राहिली. तेव्हा संदीप भालेराव, रंजना सपकाळे, सपना इंगळे, आशाबाई भालेराव,वंदना बोरुडे व माधव भालेराव यांनी जबरदस्तीने या तरुणीचा गर्भपात केला. तेव्हा या सर्व सहा जनाविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.