अमरावती: युवक कॅांग्रेसने झाकली शिवाजी महाराजांचा अवमान करणारी पोस्टर्स,आक्रमक होत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
आज १६ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी दीड वाजता अमरावती शहरातील मुतारी, स्मशानभूमी, दारू दुकाने, सर्व्हिस गल्ल्यांच्या भिंतींसारख्या आक्षेपार्ह ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांची पोस्टर्स लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे जनतेच्या श्रद्धेचा अवमान होत असून सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या शहर युवक कॅांग्रेस पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय कॅाटन फंड व बच्छराज प्लॅाट परिसरातील आपमानास्पद पद्धतिने लावलेली.....