नागपूर शहर: कळमना पोलिसांची धडक कारवाई:रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीला अटक : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 'लखोटिया सेल्स कॉर्पोरेशन' या गोदामात चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अटक आरोपी: १९ वर्षीय आदित्य सुरेश डेलीकर आणि दोन अल्पवयीन मुले आहेत. आरोपी कडून रोख रक्कम आणि गुन्हा वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.