लातूर : आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत आम आदमी पार्टीने लातूर शहरातील तरुण वर्ग आणि गरजू नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी सांगितले की, लातूर महानगरपालिकेत आम आदमी पार्टीची सत्ता आल्यानंतर शहरातील युवक व तरुणींना थेट महापालिकेकडून 5000 रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.विशेष म्हणजे या रोजगारांसाठी कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक पात्रतेची गरज असणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.