पश्चिम रेल्वेकडून येत्या ३ नोव्हेंबरपासून ओखा-मदुराई दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रेल्वेला वाशिम आणि हिंगोलीसारख्या महत्त्वाच्या जिल्हास्तरीय स्थानकांवर थांबा न दिल्याने प्रवासी संघटना आणि नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रेल्वे रोको आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.