नागपूर शहर: सावधान! 'डिजिटल अरेस्ट' नावाची कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही; योगेश घारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी तीन मेला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवनवीन युक्ती शोधल्या आहेत. सध्या 'डिजिटल अरेस्ट' च्या नावाखाली लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहर सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.