खंडाळा: लोणंद पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरण आणले उघडकीस; २० मोबाईल जप्त करत दोन संशयीतांना केली अटक
लोणंद शहरातील आठवडी बाजारातील मोबाईल चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांना अटक करून तब्बल २० मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे ४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याबाबत पोलीस ठाण्यातुन मंगळवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुरूवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ विशेष पथक तयार केले होते. त्यांनी कारवाई केली.