नागपूर शहर: उन्हाचा तडाखा पाहता नागपुरात ३१ चौकांत दुपारी 'लाल ब्लिंकर' सुविधा
नागपूर शहरातील वाढत्या तापमानाचा विचार करून वाहतूक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात कमी रहदारी असलेल्या ३१ चौकांमध्ये दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत सिग्नल 'रेड ब्लिंकर' मोडवर ठेवण्यात येणार आहेत. या चौकांतून वाहन चालवताना वाहनधारकांनी २० किमी प्रति तास वेग मर्यादा पाळावी आणि 'थांबा, पहा आणि पुढे जा' या नियमाचे पालन करावे.या निर्णयामुळे वाहनधारकांची वेळ व इंधनाची बचत होणार असून, उन्हाळ्याच्या तडाख्यापासून बचाव होण्यास मदत होईल.