पनवेल: कामोठे पोलिसांच्या ताब्यातील आरोपी फरार
Panvel, Raigad | Jun 8, 2026 बाईक चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी कामोठे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे. कामोठे पोलिसांनी बाईक चोरीच्या प्रकरणात २७ वर्षीय चंद्रकांत काटकर याला वडाळा येथून अटक केली होती. अटकेनंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिस कोठडीत असतानाच त्याने पोलिसांची नजर चुकवून तेथून पलायन केले.