नागपूर शहर: उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राच्या भावावर हातोड्याने जीवघेणा हल्ला करणारा ताब्यात : रामेश्वर तायडे psi
पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तायडे यांनी 9 एप्रिलला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार व्यापारासाठी घेतलेले ३ लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच मित्राच्या मोठ्या भावावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या प्रकरणातील फरार आरोपी वसीम सलीम खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तायडे यांनी दिली आहे.