नागपूर शहर: चोरट्याने आधी जोडले हनुमंतासमोर हात, नंतर केले मंदिर साफ, नागपुरातील चोरट्याचे हे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
शांतीनगर हद्दीतील लालगंज गुजरी येथील हनुमान मंदिरात भर दुपारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक ऑगस्टला दुपारी सुमारास एका अज्ञात चोराने मंदिरात प्रवेश केला. विशेष म्हणजे, चोराने आधी हनुमानासमोर हात जोडले आणि त्यानंतर लोकांची नजर चुकवून दुर्गादेवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट तसेच दोन किलो वजनाची पितळी घंटा असा एकूण २५,००० रुपये मूल्याचा मुद्माल चोरून नेला. भर दुपारी घडलेल्या या दुसाहसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.