चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात क्रांती घडवून आणनारे,गोंडवाना विद्यापीठ क्रिडा समिती सदस्य डॉ. राकेश तिवारी यांची महाराष्ट्र आलिंपीक संघटनेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा शहरातील बहुउद्देशीय विद्यार्थी बास्केटबॉल क्लबच्या वतीने हाटेल सनी पाइंट येथे शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डा. बि.प्रेमचंद याच्यासह अन्य मान्यवर उपस्थीत होते.