नागपूर शहर: सोनेगाव पोलिसांची धडक कारवाई: हद्दपार आरोपीला अटक
1 जूनला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळाली त्या माहितीनुसार सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एका हद्दपार आरोपीला अटक केली आहे. इंद्रप्रस्थ नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या सुचित रविप्रकाश चहांदे याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता, त्याला पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्रमांक १ यांच्या आदेशानुसार नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून २ वर्षांकरिता हद्दपार करण्यात आल्याचे समजले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त