मुर्तीजापूर: शिवनी विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर चालना 209 कोटी रुपये मंजूर आमदार साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया.
अनेक वर्षांपासून कागदोपत्री अडकलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत धावपट्टी विस्तारासाठी २०८.७६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. हा निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेषाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.शिवणी विमानतळाची सध्याची धावपट्टी १४०० मीटर आहे. वाणिज्यिक उड्डाणांसाठी किमान १८०० मीटर धावपट्टी आवश्यक आहे.