नागपूर शहर: नागपूर एलआयसी कार्यालयात शिवसैनिकांचा धडक मोर्चा; कंत्राटदाराकडून कामगारांच्या शोषणाविरुद्ध संताप
एलआयसीच्या नागपूर मंडळ कार्यालयात कंत्राटी सफाई कामगारांच्या शोषणाविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शेकडो कामगारांनी मंडल प्रबंधक प्रवीण निरंजन यांच्या कार्यालयाला घेराव घातला.२६ दिवस काम करूनही कंत्राटदाराकडून केवळ १४-१५ दिवसांचेच वेतन दिले जाते.नोकरीच्या बदल्यात प्रत्येक कामगाराकडून ३० हजार रुपयांची मागणी केली जाते.