मिरज: गणेश विसर्जनाला गेलेल्या वृद्धाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू; कसबे डिग्रज मधील मारुती घाटावरील घटना
Miraj, Sangli | Sep 3, 2025 सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कसबे डिग्रज मधील मारुती घाटावर गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी गेलेल्या वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू झाला. अरुण मुरलीधर देसाई ( वय ६२ रा. कसबे डिग्रज ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह रेस्क्यू करण्यात आला असून या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. गणेश उत्सवाच्या सातव्या दिवशी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी कसबे डिग्रज मध्ये कृष्णा नदीच्या मारुती घाटावर, गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली होती. बरेच जण नदीत उतरून