अलिबाग: रेवस-करंजा पूल प्रकल्पबाधित भरपाईपासून वंचित
Alibag, Raigad | Apr 8, 2026 रेवस ते करंजा या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्ग पुलामुळे करंजा येथील 400 स्थानिक नागरिक बाधित झाले आहे. पुलाच्या कामाला सुरुवात होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, बाधित मच्छीमार आणि शेतकरी वर्गाला अद्याप शासनाकडून एक छदामही नुकसान भरपाई मिळालेली नाही. आत्ता तर शेतकऱ्यांच्या खाजगी जागेत जमिनीची टेस्टींगसाठी पायलींग सुरू असून शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी घेतलेली नाही.