अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस स्टेशन परिसरात बनावट डॉक्युमेंट तयार करून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हबीब बक यांच्याशी आरोपी अब्दुल रफीक, मुजफ्फर, ताजिर, मुकर्रम, आसिफ मन्सुरी व अतीफ यांनी संपर्क साधून काही कागदपत्रे बनवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून ५० हजार रुपये घेतले....