भोकरदन: 15 ऑगस्ट होणाऱ्या ग्रामसभेची गावकऱ्यांना माहिती द्या,सा.कार्यकर्ते सचिन वेंडोले,यांचे वालसावंगी ग्राम.कार्यालयात निवेदन
आज दिनांक 10 ऑगस्ट 2026वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता सामाजिक कार्यकर्ते सचिन वेंडोले यांनी ग्रामपंचायत कार्यालय वालसावंगी येथे ग्रामसेवक यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा होणार आहे, मात्र या ग्रामसभेची सर्व गावकऱ्यांना माहिती द्यावी जेणेकरून गावाच्या विकासावर गावकरी चर्चा करतील अशा मागण्यांची निवेदन त्यांनी आज दिली आहे.