तुमसर: चुल्हाड येथे दारूबंदीसाठी नागरिकांचा पुढाकार, ग्रामसभेत दारूबंदी समिती गठित
तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात सन 2011 वर्षापासून दारूबंदी आहे, मात्र, काही लोक छुप्या पद्धतीने दारू विक्रीचा व्यवसाय करतात. दारू विक्रेत्यांना दारू न विकण्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समजही दिली मात्र दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू केला. याची दखल घेत आज दि. 20 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 12 वा. ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून दारूबंदीसाठी पुढाकार घेतला व दारूबंदी समिती गठित करण्यात आली.