नागपूर शहर: कळमना परिसरातील मसाला उद्योगाला आग; ५० लाखांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश
कळमना येथील चिखली चौक परिसरातील एका मसाला उद्योगाला मध्यरात्री भीषण आग लागली. सुदैवाने, अग्निशमन दलाने तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवल्याने अंदाजे ५० लाख रुपयांची मालमत्ता खाक होण्यापासून वाचली आहे.ही घटना आज, ६ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता आगीचा कॉल प्राप्त झाला. चिखली चौक, रेल्वे रोड, कळमना येथील कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन अवघ्या चार मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.