नागपूर शहर: संतापजनक ! पिटेसुरमध्ये खदान परिसरात असलेल्या खड्ड्यात बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू; प्रशासनाविरुद्ध संताप
मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिटेसुर येथे एका खदानीत बुडून रुजैन अब्दुल रझाक शेख या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेळता खेळता रुजैन खदानीच्या पाण्यात पडला आणि खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि मानकापूर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून अर्ध्या तासात रुजैनला बाहेर काढले.नागरिकांनी घटनास्थळी CPR देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोवर उशीर झाला होता.यापूर्वीही येथे अशा घटना घडल्या आहेत.