अलिबाग: रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे वाहतूक वेगवान होणार
Alibag, Raigad | Jun 8, 2026 रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा आणि कोकणातील वाहतुकीचे चित्र बदलणारा बहुप्रतीक्षित साळाव-रेवदंडा (कुंडलिका खाडी) पूल सध्या वेगाने आकार घेत आहे. तब्बल १,२५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे अलिबाग, मुरुड आणि रोहा हे तीन महत्त्वाचे तालुके अधिक प्रभावीपणे जोडले जाणार असून, भविष्यातील वाहतुकीसाठी हा पूल 'गेमचेंजर' ठरणार असल्याचे मानले जात आहे.