रावेर: सावदा रावेर रस्त्यावर श्रीकृष्ण पेट्रोल पंपावर बेशुद्ध पडून अनोळखी ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू,सावदा पोलिसात नोंद
Raver, Jalgaon | Sep 29, 2025 सावदा शहरातून रावेर कडे जाणाऱ्या रोडावर श्रीकृष्ण पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाच्या समोर चक्कर येऊन एक अनोळखी ४५ वर्षीय इसम बेशुद्ध झाला. तातडीने त्याला १०८ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.