तुमसर: डोंगरी बुजुर्ग मॉइल परिसरात २ आरोपींकडून मॉइल कर्मचाऱ्याला मारहाण, आरोपींविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग मॉइल परिसरात दोन आरोपींनी मॉइल कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 15 ऑक्टोंबर रोज बुधवारला रात्री 8 वाजता च्या सुमारास घडली. यातील फिर्यादी रोहित डहाळे असे जखमी कर्मचाऱ्यांचे नाव असून ते डोंगरी बुजुर्ग मॉइल परिसरात क्रेशर पॉईंटवर ड्युटी करीत असताना त्यांना दोन इसम संशयितरित्या दिसून आले. यावेळी फिर्यादीने आरोपी राहुल पुष्पतोडे याला पकडले असता आरोपी ज्ञानेश्वर उईके याने फिर्यादीच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी केले.