सावळा तालुका धामणगाव रेल्वे येथे अवैध सावकारी व्यवसायावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत ही धाड टाकण्यात आली. जिल्हा उपनिबंधक श्री. शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, धामणगाव रेल्वे यांनी दोन तपासणी पथक तयार करून दतापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सावळा येथील रहिवासी श्री. गोपाल प्रभाकर टेकाडे यांच्या घर व शेतशिवारात एकाच व