मोर्शी: महा विदर्भ शिक्षक कर्मचारी जनसंग्राम संघटनेचेवतीने, मोर्शी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण
आज दिनांक 17 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पासून महाविदर्भ शिक्षक कर्मचारी जनसंग्राम संघटनेचे वतीने मोर्शी नगरपरिषद कार्यालयासमोर सौ अर्चना सुरेंद्र वानखेडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र नगरपरिषद शिक्षक विभागाने पत्र दिल्यानंतर उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी, शिक्षक संघटनेसोबत पुढील चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले