हदगाव: भानेगाव फाट्याजवळ तिहेरी अपघातात तिघेजण मृत्युमुखी झाल्याप्रकरणी हदगाव पोलिसांत गुन्हा नोंद
Hadgaon, Nanded | Oct 27, 2025 दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास हदगाव ते उमरखेड जाणाऱ्या रोडवर भानेगाव फाटा येथे रोडवर जेसिबी उभे केला असता आयचरने त्यास धडक दिली व मागून चंद्रपूरकडे जाणारे लातूर येथील कुटुंबियांची चार चाकी गाडी धडकून त्यातील तिघेजण ठार झाले होते, ह्या प्रकरणी फिर्यादी रामराव देगुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हदगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोउपनि बर्गे हे करत आहेत.