साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे काल रविवारी हृदयद्रावक घटना घडली होती. कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर तीन बालिका बसलेल्या असताना टॅक्टर अचानक उतारावरुन चालत जावून शेजारील ५० फुट विहिरीत कोसळले होते. घटनेनंतर तातडीने शोधकार्य सुरु करण्यात आले. यावेळी एका बालिकेला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले होते. तर दोन बालिकांना शोधण्याचे कार्य रविवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होते. अखेर रात्री ११ वाजता खुशी ठाकरे (३) या बालिकेचा मृतदेह सापडला. तर आज सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता ऋतिका गायकवाड