हवेली: वाघोली येथे पुणे-नगर महामार्गाच्या कडेला पार्क केलेल्या कारने अचनाक घेतला पेट
Haveli, Pune | May 14, 2025 वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलसमोर पुणे नगर महामार्गाच्या कडेला पार्क केलेल्या चार चाकीने अचानक रेट घेतल्याची घटना घडली. यावेळी पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.