कंधार: उस्माननगर शेतशिवारात ४ आरोपी अंदर बाहर जुगार खेळत व खेळवित असताना नगदी १४,७०० व दुचाकी ६० हजाराचे मुद्देमालासह मिळुन आले
Kandhar, Nanded | Oct 12, 2025 कंधार तालुक्यातील मौजे उस्मानगर शेतशिवारात दि ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १३:४० वाजेच्या सुमारास यातील आरोपी १) साईनाथ काळम २) श्याम काळम ३) संभाजी ढगे ४) दीपक टक्के हे विनापरवाना बेकायदेशीरित्या अंतर्बाहर नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना नगदी १४,७०० रू व मोटारसायकल किंमत ६० हजार रुपयेचे मुद्देमालासह पोलीसांना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादी पोलिस हेडकॉन्स्टेबल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी सायंकाळी उस्मान नगर पोलीसात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास आज सुरू आहे.