अंजनगाव सुर्जी येथील आमदार गजानन लवटे यांच्या गोकुळ डोसा येथील जनसंपर्क कार्यालयात आज सायं ५:३० वाजता सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित विजयी नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ०७ तसेच समाजवादी पार्टीचे ०२ अशा एकूण ०९ नगरसेवकांचा आमदार लवटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.