भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात जखमी अवस्थेत नहारामध्ये पडलेल्या वाघाची घटना समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी “जास्त थंडी वाटत असल्याने वाघाने घेतली ओल्डमंक” अशा उपरोधिक शीर्षकाखाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. सदर व्हिडिओ १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.