नागपूर शहर: मुख्यमंत्र्याच्या शहरात महिला सफाई कर्मचारी असुरक्षित;विनयभंगाची धक्कादायक घटना
शहरात स्वच्छतेचे रक्षण करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.19 मे ला सकाळ च्या सुमारास कचरा संकलनाचे काम करत असताना एका अज्ञात इसमाने महिला कर्मचाऱ्याला लाथ मारून तिच्याशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.