नागपूर शहर: भल्या सकाळी झालेल्या हिट अँड रन च्या घटनेने उपराजधानी हादरली, धरमपेठ भागात भरधाव कारने महिलेला चिरडले
चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क समोरील सुगंध मंगल कार्यालयाला लागून असलेल्या खरे टाउन कडे जाणाऱ्या गल्लीत मॉर्निंग वॉक आणि योगासाठी जात असलेल्या मंगला केवटे वय 72 वर्ष यांना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारणे चिरडले. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला प्राथमिक तपासात काळजालाक मध्य धुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.