एरंडोल: आंबे ब्राह्मणे येथून विवाहिता तीन बालिकांसह झाली बेपत्ता, कासोदा पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
एरंडोल तालुक्यात आंबे ब्राह्मण हे गाव आहे. या गावातील रहिवासी भारतीय माळी-भिल वय २७ ही विवाहिता आपल्या सोबत मुलगी सोनाक्षी वय ७, मुलगी आराध्या वय ५ व मुलगी सेजल वय ३ या तिघांना घेऊन आपल्या घरी सांगून गेली की मी ब्लाउज शिवायला टाकण्यासाठी जात आहे. असे सांगून घराच्या बाहेर गेलेली विवाहिता आणि मुली बेपत्ता झाल्या. तेव्हा या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.