मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्ष चिमुकलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्वत्र मागणी होत आहे. अशातच नागपुरातही शहीद चौकातून आज भव्य मोर्चा काढत आणि त्या चीमुकलीची ला श्रद्धांजली अर्पण करत त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी काळे कपडे घालून तसेच हाताला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला.