लातूर: टीम ‘दुर्गा’चा सातवा मदत दिवस ! लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त 500 कुटुंबांपर्यंत पोहोचली जीवनावश्यक मदत
Latur, Latur | Oct 7, 2025 लातूर :-सलग अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या शेतकरी आणि कामगार वर्गासाठी टीम ‘दुर्गा’ सातत्याने मदतीचा हात पुढे करत आहे. आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी सातव्या दिवशी या अभियानांतर्गत तब्बल 500 गरजू कुटुंबांपर्यंत अन्नधान्य, किराणा, साड्या व शैक्षणिक साहित्य यांसारखी जीवनावश्यक मदत पोहोचवण्यात आली. असल्याची माहिती आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान दुर्गा टीमच्या मुख्य संयोजक तथा भाजपा च्या रागिनीताई यादव यांनी दिली आहे.