पोलादपूर: साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन मंत्री गोगावलेंच्या आश्वासनामुळे मागे
रायगड जिल्ह्यातील पोलादपुर येथील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी गावात सरण रचून शासनाला स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावर चर्चा करण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात साखर सुतारवाडी ग्रामस्थ व प्रशासनाच्या बैठकीत योग्य उत्तरे न मिळाल्याने साखर सुतार वाडीतील ग्रामस्थांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. मूळ दरडग्रस्त गावात सरण रचलेल्या ठिकाणी जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांमार्फत ग्रामस्थांना रोखण्यात आले.