लातूर: लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध,१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन
Latur, Latur | Oct 8, 2025 लातूर, दि. ०८ : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.