नागपूर शहर: नागपुरात कुत्र्यांच्या तावडीतून सर्पमित्राने वाचवला घोरपडीचा जीव
नागपूरमधील हुडकेश्वर येथील गजानन नगर परिसरात आज, २८ जून रोजी दुपारी २:०० वाजता एक थरारक घटना घडली. शुभांगी कलमगे यांच्या घरात अचानक तीन फूट लांबीची घोरपड शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी जेवण करत असताना सर्पमित्र शुभम पराळे यांना फोनद्वारे या घटनेची माहिती मिळाली.