लातूर : लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असूनही ११ नोव्हेंबर २०२५ रोजी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा, रेणापूर, औसा आणि उदगीर या पाच नगरपरिषदांतून नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी एकही नामनिर्देशन अर्ज प्राप्त झालेला नाही.