जालना: तायक्वांदो खेळाडू विशाखा दवंडे हिचा पोलीस दलात निवडीबद्दल जालन्यात सन्मान
Jalna, Jalna | Mar 31, 2026 आज दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार तायक्वांदो या खेळात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी जालन्याची विद्यार्थिनी विशाखा विलास दवंडे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल जालना शहरात तिचा उत्साहात सत्कार करण्यात आला. जालना येथील रहिवासी असलेल्या विशाखा विलास दवंडे हिने जालना जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या माध्यमातून तायक्वांदो या खेळात सातत्याने मेहनत घेत अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर तिने