तालुक्यातील सायवन गावाजवळ सिटीपीएस मधून निघणाऱ्या राखेची साठवणूक करुन तिची वाहतुक करण्यात येत आहे. हि राख वातावरणात मिसळून त्याचा त्रास गावकऱ्यांना होत असुन त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. याशिवाय राखेच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर राख पसरुन अपघातही होत आहे. त्यामुळे या ढिगाऱ्यांवर व वाहतुकीवर आवश्यक उपाययोजना कराव्या यासाठी भाजपत भाजप महिला मोर्चा ग्रामीण च्या तालुकाध्यक्षा रक्षीता निरंजने यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे.