आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मुख्य रोडवर मागील काही दिवसापासून मोठा गड्डा पडला होता या गडामुळे रोज छोटे-मोठे अपघात या ठिकाणी होत होते,आणि अपघातामुळे काही काळ भोकरदन शहरातील वाहतूक सुद्धा ठप्प होत होती त्यामुळे नागरिकांनी मागणी केली होती की भोकरदन नगरपरिषद व बांधकाम विभाग भोकरदन यांनी तात्काळ हा गड्डा दुरुस्त करावा त्यामुळे या मागणीवरून आज रस्ता गड्डामुक्त झाल्याचे पाहायला मिळाले.